दापोली /प्रतिनिधी
दापोली तालुक्यात १६ वर्षीय एका अल्पवयीन मुलीजवळ शरीरसंबंध ठेवल्याने जामगे येथील संशयित आरोपी योगेश जाधव वय 21 या तरुणावर पोक्सो अंतर्गत नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आरोपीला खेड कोर्टात हजर केले असतात खेड कोर्टाने दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
दापोली पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहिती नुसार जानेवारी २०१७ ते मे २०२० या कालावधीत हा प्रकार घडला आहे. तालुक्यातील हर्णै येथील एका आंबा बागेत हे दोघे बाग राखण्यासाठी गेले असताना योगेश याने अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवले. त्यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. भादवि ३७६ व बाल लैंगिक अत्याचार या पोक्सो कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ अधिक तपास करत आहेत.