वार्ताहर / मौजेदापोली
दापोली पंचायत समितीचे माजी सभापती व शिवसेना तालुका मुंबई कार्यकारणीचे माजी संघटक श्रीपत पवार यांचे नुकतेच गावतळे हनुमानवाडी येथील रहात्या घरी ह्य्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. श्रीपत पवार हे शिवसेनेचे मोठे कार्यकर्ते होते. त्याचबरोबर विविध संघटनाचे पदाधिकारी म्हणून काम केले आहे. गावातील, पंचक्रोशीतील विकास कामांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या जाण्याने पंचक्रोशीत दु:खाचे वातावरण आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे, भाऊ, तीन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.