प्रतिनिधी /वाई :
संकटे आली म्हणजे एकामागून एक अशी येत असतात. मात्र, या संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र असतो, असे म्हटले जाते. दुनियादारी या चित्रपटात जसे कॉलेज, शाळेच्या काळातील मैत्री पुढे काही वर्षानंतर मैत्री, दोस्तीच कायम असते. दोस्तीसाठी वाटेल ते करतात. याच कोरोनाच्या संकटात ही मदतीला धावून जाणारा मित्र अन मित्रांचा एक ग्रुप आहे. वाई तालुक्यातील एकसर येथील तुषार तरडे यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या मित्रांनी चार महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या व्हाट्सअपग्रुपवर हाक देताच जमेल तेवढी मदत गोळा केली अन त्यांच्या कुटूंबियांना दिली. मदत मिळाल्यावर आनंदाचे अश्रू तरडे कुटूंबियांना झाले.
कोरोनाचे संकट जगावर कोसळले आहे. त्या संकटात कोणाची नोकरी गेली आहे तर कोणाला प्राणाला मुकावे लागले आहे. कोणाचे उपचारासाठी घरदार गेले आहे. मात्र, अशा संकटात मैत्रीचा धागाच मदतीला येतो. मैत्री काय असते हे फक्त चित्रपटामधून पहायला मिळते. मग हिंदीतला दोस्तानापासून ते मराठीतील दुनियादारी या चित्रपटापर्यंत पहायला मिळते. चित्रपटात शोभेल अशीच मैत्रीची कथा वाई तालुक्यातील नुकतीच घडली आहे. वाई येथील महर्षी शिंदे विद्यालय येथे 1995 ला दहावी क मध्ये शिकणाऱया वर्गातल्या सटालेवाडी येथील गुलाब वाडकर यांच्या संकल्पनेतून 25 वर्षांपूर्वीचे जुने मित्र एकत्र यायचे ठरवले. एकेक करत 40 जण व्हाट्सएपच्या माध्यमातून एकत्र आले.
कोरोना संकटात ग्रुपमध्ये कोणाला अडचण असेल तर लगेच मदत केली जावु लागली. गृपची स्थापना 17 जून 2020 ला करण्यात आली. कोरोना काळात ज्यांची नोकरी गेली त्यांना आधार दिला जात आहे. अशातच ग्रुपमधील एकसर येथील तुषार तरडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ही बातमी समजताच त्यांच्या कुटूंबाच्या मदतीसाठी सर्वच सवंगडी आपल्या परीने पुढे आले. केवळ दोनच दिवसात 41 हजार रुपये जमा झाले. त्यांच्या कुटूंबियांना ही मदत केली.त् ारडे यांच्या कुटूंबियांना अश्रू अनावर झाले. तर तरडे यांच्या आईवर ही उपचार सुरू आहेत. त्यांच्याही मेडिकल बिलासाठी अजित मांढरे हे सहकार्य करत आहेत. यावरून पंचवीस वर्षे शाळेत एकत्र वर्गात बसलेले, शिकलेले मित्र पुन्हा सोशल मीडियाच्या सहाय्याने एकत्र आले. त्याच मित्रांची एकमेकांप्रति असलेली मैत्रीची भावना, मैत्रीची चळवळ खरोखरच वाई तालुक्यातील कौतुक होत आहे. सामाजिक कार्य मैत्रीतून उभं राहतं हे यातून दाखवून दिले आहे.
लवकरच ऑक्सिजन मशीन घेणार
कोरोनामुळे कित्येक रुग्णांचे हाल होत आहेत. आपल्या मित्र मंडळींमध्ये कोणाचे ऑक्सिजन मशिनमुळे गैरसोय होऊ नये म्हणून 10 वी 1995-96 मित्रपरिवार लवकरच दोन ऑक्सिजन मशीन घेणार आहे, असे या मित्रपरिवाराचे गुलाब वाडकर यांनी सांगितले.