- रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत नाईट कर्फ्यू
ऑनलाईन टीम / चंदीगड :
चंदीगडमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर चंदीगड प्रशासनाने घालण्यात आलेल्या निर्बंधात सूट दिली आहे. या अंतर्गत आता चंदीगड मधील सर्व दुकाने सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच सर्व हॉटेल्स आता 50 टक्के क्षमतेने सकाळी 10 ते रात्री 10.30 या वेळेत सुरू असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आता रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत नाईट कर्फ्यू जारी असणार आहे. लग्न समारंभ, अंतिम संस्कार आणि अन्य सामाजिक कार्यक्रमांमध्ये आता 30 च्या ऐवजी 50 नागरिकांना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे.
यासोबतच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मेंबर्ससाठी सुरू करण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून देण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. यासोबतच सुखना लेकमध्ये 50 टक्के क्षमतेने बोटिंग सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
दरम्यान, प्रशासनाने मागील आठवड्यातच रविवारचा कर्फ्यू रद्द केला होता. त्यामुळे आता सातही दिवस दुकाने सुरु असणार आहे. शहरात आता दररोज कोरोना रूग्णांची संख्या 20 पेक्षा ही कमी येऊ लागली आहे, त्यामूळे प्रशासनालाकडून हळूहळू सूट दिली जात आहे.