ऑनलाईन टीम / हैदराबाद :
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियातून स्पुटनिक व्ही ची दीड लाख डोसची पहिली खेप हैदराबाद विमानतळावर पोहोचली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.

दरम्यान, देशात आजपासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अडथळे येत आहे. अशातच स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप भारतात दाखल झाल्याने येत्या काळात लसीकरण मोहिमेला गती मिळणार आहे.
यापूर्वीच भारतने स्पुटनिक व्ही या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. तसेच आपण सर्वांनी एकत्र लढूया आणि कोरोनाला हरवूया असा विश्वासही कंपन्यांनी व्यक्त केला होता.