ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी त्यांच्या टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यातून त्यांना कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले.
सध्या ते राजीव गांधी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना ताप आला असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे सध्या त्यांना ऑक्सिजनच्या सहाय्याने श्वास घ्यावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन तीन दिवसांपासून त्यांची तब्येत बघडली होती. त्यामुळे त्यांना राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांची दोन वेळा कोरोना टेस्ट करण्यात आली आहे आणि त्यांची दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.