- बुधवारी 5,673 नवे रुग्ण; तर 40 मृत्यू
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झालेली दिसून आली आहे. बुधवारी पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले आहेत. मागील 24 तासात 5,673 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 4,128 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यासोबतच कालच्या एका दिवसात 60,571 टेस्ट करण्यात आल्या.

दिल्ली सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, बुधवारी एका दिवसात 40 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यातील एका रुग्णाचा मृत्यू ऑगस्ट मध्ये झाला होता. याची नोंद कालच्या आकड्यांमध्ये करण्यात आली आहे.
मागील 10 दिवसात झालेल्या मृत्यू दराचे प्रमाण 0.99 % इतके आहे. सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 9.37 % आहे. तर 3,047 झोन आणि 321 कंट्रोल रूम आहेत.