ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, केजरीवाल सरकारकडून डिझेलचे भाव कमी करण्यात आले आहेत. दिल्लीत आता केवळ 16 टक्के व्हॅट लावण्यात येईल. तर डिझेल चे दर 8 रुपये 36 पैशांनी कमी केले आहेत.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, दिल्लीत सध्या 82 रुपये प्रति लिटर भाव आहे. आता 30 टक्के असलेला व्हॅट कमी करत 16 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे आता डिझेलचे दर 8 रुपयांनी कमी झाले असून 76.64 इतका झाला आहे.
पुढे ते म्हणाले, राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता दिल्लीतील लोकं कामाच्या ठिकाणी जाऊ लागले आहेत. वातावरण सुधारत आहे तसेच कोरोनाचा संसर्ग देखील कमी होत आहे.