ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. 24 तासात 2,260 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 182 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसात तब्बल 6,453 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील संसर्गाच्या दरात घट झाली असून 3.58 % इतका झाला आहे. काल हा दर 4.76 % इतका होता.

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 86 लाख 59 हजार 148 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 43,061 आरटीपीसीआर टेस्ट आणि 20,094 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत. मृत्यूचे प्रमाण 1.63 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 48,429 झोन आहेत. तर 519 कंट्रोल रूम आहेत.
दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 14 लाख 15 हजार 219 वर पोहचली असून त्यातील 13 लाख 60 हजार 898 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 23,013 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 31 हजार 308 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- लसीकरणाचा डाटा
दिल्लीत मागील 24 तासात 49 हजार 957 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 41,155 जणांना पहिला डोस 8,802 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 50 लाख 17 हजार 579 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये 38,85,425 जणांना पहिला डोस तर 11,32,154 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.