- 50 रुग्णांना केले दुसऱ्या वार्डमध्ये शिफ्ट
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातील आयसीयू वार्डला आज पहाटे 6.35 वाजता आग लागली असल्याची घटना घडली आहे. यामध्ये कोणतीही मानवी हानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच तात्काळ या वॉर्ड मधील 50 रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 6.35 वाजता रुग्णालयातील तळ मजल्यावरील आयसीयू वॉर्डला आग लागली. त्यानंतर लगेचच अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि तासाभरातच त्यांनी आग आटोक्यात आणली.
सद्य स्थितीत आग विझविण्यात आली असून सर्व जण सुरक्षित आहेत. मात्र, आयसीयूमधील सर्व मशिन्स आणि समान जळून खाक झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.