ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केजरीवाल सरकारने मंगळवारी एक नवीन घेतला आहे. या निर्णयानुसार, ‘घरोघरी रेशन योजने’च्या अंतर्गत गरजूंना आता घरपोच रेशन सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, दिल्ली कॅबिनेटने मुख्यमंत्री घरोघरी रेशन योजना च्या अन्न धान्य पुरवठा खात्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. या निर्णयाचा मला व्यक्तिशः आनंद झाला आहे. कारण राजकारणात येण्यापूर्वी मी आणि मनीष सिसोदिया आम्ही दोघे मिळून परिवर्तन नावाची एक संस्था चालवत होतो. दिल्लीतील झुग्गी वस्तीमधील गरीब लोकांच्या हक्कासाठी आम्ही काम करत होतो.

पुढे ते म्हणाले, जेव्हा रेशन मिळत नव्हते त्यावेळी त्यांना रेशन मिळवून देण्यासाठी काम करत असू. सूचना अधिकार कायद्याचा सर्वाधिक उपयोग आम्ही लोकांना रेशन देण्यासाठी केला आहे. त्या दिवसात लोकांचे रेशन चोरी होत असे त्यामुळे त्यांना पुरे रेशन मिळत नसे. सरकारी कागदपत्रांमध्ये तर एंट्री होत असे की सर्वांना रेशन मिळाले आहे तसेच सर्वांचे खोटे अंगठे देखील घेतले जात असत.
पण आता या योजनेअंतर्गत गरजूंना घरपोच रेशन देणार आहोत. यासाठी आम्ही एसपीआयच्या गोडाऊन मधून गव्हाची खरेदी करुन ते दळले जाईल त्यानंतर त्याचे पॅकिंग केले जाईल. त्यासोबत तांदूळ आणि साखर सारख्या अन्य सामानाचे देखील पॅकिंग करुन हे सर्व रेशन लोकांना घरपोच दिले जाणार आहे.
पुढे ते म्हणाले ही योजना घरोघरी पोहोचवली जाणार आहे. यामध्ये सरकारी रेशन दुकानातून रेशन नेण्यास पात्र असणाऱ्या लोकांना टोल फ्री क्रमांक दिला जाईल. या नंबरवर फोन करुन लोकांना आपली ऑर्डर द्यायची आहे. त्यानंतर सांगितलेल्या वेळेत लोकांना घरपोच रेशन पाठवले जाईल.
तसेच दिल्ली सरकारची ही योजना आगामी 7 महिन्यांत सुरु केली जाणार आहे. यामुळे गरिबांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळेल. पुढे ते म्हणाले वित्तीय वर्ष 2020-21 च्या आधी ही योजना सुरु होईल. म्हणजेच पुढच्या वर्षी मार्च महिन्याच्या आधीच ही योजना सुरु केली जाणार आहे.