सावंतवाडी/प्रतिनिधी-
मोपा- फकीरफाटा येथील दिवाकर उर्फ नितीन राजाराम मावळणकर या युवा प्रगतशिल शेतकरयाला गोवा शासनाचा स्टार फार्मर पुरस्कार जाहीर झाला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते साखळी येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नितीन मावळणकर यांनी वडिल राजाराम मावळणकर यांच्यापासुन प्रेरणा घेउन शेती क्षेत्रात काम सुरु केले. काजु पिकाच्या क्षेत्रात त्यांनी विविध प्रयोग करीत स्वताची काजुची जात विकसित केली. ड्रोनद्वारे काजुवर फवारणी करण्याचा प्रयोग त्यांनी केला. बांदा भागात काजु लागवड करताना त्यांनी महीला, युवक यांना राेजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. ते काजु लागवड, अौषध फवारणी याबाबत शेतकरयाना मार्गदर्शन करीत असतात. काजु पिकाबाबत ते नवनविन प्रयाेग करुन त्यातुन अधिकाधिक उत्पादन कसे मिळवता येईल याची मांडणी करीत असतात. काजु लागवडीबरोबर अन्य पिकाचे ते उत्पादन घेतात. त्यांच्या या उपक्रमशिलतेची दखल गोवा शासनाने घेउन त्याना स्टार फार्मर पुरस्कार दिला आहे. सावंतवाडी दोडामार्ग फळबागायतदार संघटनेत ते कार्यरत आहेत. संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत, प्रकाश वालावलकर आणि पदाधिकारयानी त्याचे अभिनंदन केले आहे.