मसूर/ प्रतिनिधी
: शामगाव – मसूर रस्त्यावर मसूर पोलीस दूरक्षेत्रा जवळ उसाच्या ट्रॉलीला ओव्हरटेक करताना अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवरील वरील ऊस तोडणी मजुराची सहा वर्षाची बालिका खाली पडल्याने ट्रक्टरचे पाठीमागील चाक पोटावरुन गेल्याने मयत झाल्याची घटना बुधवार दि.2 रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली. ऋतुजा महादेव सरवदे वय 6 मूळ रा. वारोळा ता. माजलगाव जि. बिड सध्या रा. मसूर ता कराड असे अपघातात मयत झालेल्या बालिकेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ऊस तोडणी मजूर महादेव विठ्ठल सरवदे हे आपल्या पत्नीसह मुलीला घेऊन ऍक्टिवा मोटर सायकल नंबर एम.एच.11 एटी6762 वरून चिखली येथे ऊस तोडणी करण्यासाठी गेले होते दिवसभर ऊस तोडणी केल्यानंतर मधल्या रस्त्याने शामगाव ते मसूर जाणारे रोडने मसूर कडे परतत असताना समोरून एक उसाने भरलेल्या ट्रक्टर चालला होता सदर ट्रक्टरला दुचाकीस्वार पाठीमागून ओव्हरटेक करीत असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने दुचाकीवरील तोडणी मजूर व त्याची पत्नी रस्त्याचे उजवे बाजूस पडले तर मुलगी ट्रक्टरच्या पाठीमागील जवळ पडलेली असताना तिच्या पोटावरून ट्रक्टरचे चाक गेल्याने ती मयत झाली. सदर घटनेची खबर मयत बालिकेचे वडील महादेव विठ्ठल सरवदे यांनी मसूर दूर क्षेत्रात दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार तावरे करीत आहेत.