ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 62 हजार 480 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1587 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे मृतांचा हा आकडा मागील 61 दिवसातील सर्वात कमी आहे. दरम्यान, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 कोटी 97 लाख 62 हजार 793 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 3 लाख 83 हजार 490 एवढी आहे.
गुरुवारी 88 हजार 977 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 2 कोटी 85 लाख 80 हजार 647 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 7 लाख 98 हजार 656 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मागील 73 दिवसानंतर सक्रिय रुग्णसंख्या 8 लाखांखाली आली आहे.
आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 26 कोटी 89 लाख 60 हजार 399 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.