ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 16 हजार 488 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 113 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 10 लाख 79 हजार 979 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 56 हजार 938 एवढी आहे. देशात आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 1 कोटी 42 लाख 42 हजार 547 लोकांना लस देण्यात आली आहे.
शुक्रवारी 12,771 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 07 लाख 63 हजार 451 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 59 हजार 590 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत 21 कोटी 54 लाख 35 हजार 383 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 07 लाख 73 हजार 918 कोरोना चाचण्या शुक्रवारी (दि.26) करण्यात आल्या.