ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत देणार असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.
दिल्लीत पत्रकारांनी संवाद साधताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लसीचे ड्राय रन सुरु आहे. लसीकरण कार्यक्रम राबवताना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात येत आहे. लस उपलब्ध झाल्यास संपूर्ण देशात ती मोफत दिली जाईल. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

सुरुवातीच्या टप्प्यात 1 कोटी आरोग्य सेवक आणि 2 कोटी आघाडीचे कोरोना योद्धे यांनाच लस दिली जाईल. त्यानंतर जुलैपर्यंत उर्वरित 27 कोटी जनतेला प्राधान्यक्रम ठरवून लसीकरणाचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.