ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील आठ महिन्यातील निच्चांकी कोरोना रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. सोमवारी देशात 8 हजार 635 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 94 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 07 लाख 66 हजार 245 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 54 हजार 486 एवढी आहे.
सोमवारी 13,423 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 1 लाख 63 हजार 353 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 कोटी 04 लाख 48 हजार 406 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशात आतापर्यंत 19 कोटी 77 लाख 52 हजार 057 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 6 लाख 59 हजार 422 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.02) करण्यात आल्या.