ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 96 हजार 731 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 07 लाख 75 हजार 169 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर अजूनही 1 लाख 64 हजार 511 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात मागील 24 तासात 16 हजार 752 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 11 हजार 718 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 113 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 57 हजार 051 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 1 कोटी 43 लाख 01 हजार 266 जणांना लस देण्यात आली आहे.
देशात आतापर्यंत 21 कोटी 62 लाख 31 हजार 106 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 07 लाख 95 हजार 723 कोरोना चाचण्या शनिवारी (दि.27) करण्यात आल्या.