ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संकटातून सावरत असलेल्या देशासाठी चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील 24 तासात 12 हजार 923 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 08 लाख 71 हजार 294 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 55 हजार 360 एवढी आहे. आतापर्यंत 70 लाख 17 हजार 114 जणांना लस देण्यात आली आहे.

बुधवारी दिवसभरात 11,764 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या देशात 01 लाख 42 हजार 562 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 कोटी 05 लाख 73 हजार 372 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आतापर्यंत देशात 20 कोटी 40 लाख 23 हजार 840 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 6 लाख 99 हजार 185 कोरोना चाचण्या बुधवारी (दि.10 फेब्रुवारी 2021) एका दिवसात करण्यात आल्या.