ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंड राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच उत्तराखंडातील देहरादून जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देहरादूनमध्ये क्वारंटाइन असलेल्या युवकाने आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देहरादून जिल्ह्यातील बालावाला गावातील एका क्वारंटाइन सेंटरमध्ये असलेल्या युवकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. मृत युवकाचे नाव संकेत मेहरा असून हा हरिद्वार येथील रहिवासी आहे.
संकेत काही दिवसांपूर्वी जबलपूर येथून आला होता. त्यानंतर नियमानुसार त्याला क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, संकेतने आत्महत्या केली आहेे.
दरम्यान, पोलिसांना आत्महत्येची माहिती मिळताच, ते घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना संकेतचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळून आला. आत्महत्येचे कारण अजून समजले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.