जिल्हाधिकाऱयांच्या आदेशावरून कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर व उपनगरांतील दोन दवाखान्यांना आरोग्य विभागाने शुक्रवारी टाळे ठोकले आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्याधिकाऱयांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
भडकल गल्ली येथील शिवशक्ती आयुर्वेदिक सेवा केंद्र व वडगाव येथील हळ्ळीमने वनस्पती भंडार या दोन दवाखान्यांना टाळे ठोकण्यात आले आहेत. या संबंधी थेट जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार करण्यात आली होती. चौकशी करून कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी आरोग्य विभागाला केली होती.
जिल्हा आयुष विभागाचे डॉ. सुरेश दोडवाड, तालुका आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. आर. डुमगोळ, आयुष विभागाचे डॉ. श्रीकांत सुनधोळी आदी अधिकाऱयांनी ही कारवाई केली. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांच्या सूचनेवरून केपीएमई कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.