बेंगळूर/प्रतिनिधी
आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी, गेल्या दोन महिन्यांत राज्यातील कोविड -१९ प्रकरणांमध्ये जवळपास सहापट वाढ झाली असल्याचे म्हंटले आहे.
मंत्री सुधाकर यांनी देशातील दहा जिल्ह्यांमध्ये यामध्ये बेंगळूर शहरी जिल्हा एक आहे. कर्नाटकातही एकूण सक्रिय प्रकरणांपैकी पाच राज्यांचा ७७ टक्के वाटा आहे, असेही त्यांनी सांगितले.
शनिवारी कर्नाटकात सलग चौथ्या दिवशी ४ हजाराहून हून अधिक रुग्णांची नोंद झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान राज्यात ४,३७३. प्रकरणे आणि १९ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात शनिवारी ३ हजारहून अधिक रुग्ण सापडले आहेत.
राज्यात मागील वर्षी पहिल्या लहरी दरम्यान, सहा ते आठ आठवड्यांत इतक्या रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान यावर्षी चार आठवड्यांत आधीच यापर्यंत पोचलो आहोत. ही दुसरी लहर किती व्यापक प्रमाणात पसरत आहे हे आपल्या निदर्शनास आले आहे. सरकारने अडथळा म्हणून आणलेल्या निर्बंधांचा विचार करू नका. हे तुमच्या फायद्यासाठी आहे. आम्हाला मिळालेल्या आकडेवारीमुळे सार्वजनिक ठिकाणी संसर्ग झपाट्याने पसरत आहे. या कारणामुळे सरकारने हे निर्बंध लादलेले आहेत, असे म्हणाले.
मंत्री सुधाकर यांनी सरकारने ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या प्रत्येकासाठी लसीकरण सुरू केले आहे. आमची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वानी लसीकरण करा.” असे ते म्हणाले.