ऑनलाईन टीम / जालंदर :
काही दिवसांपूर्वी पंजाब मध्ये ड्युटी वर असलेल्या पोलिसाचा हात तलवारीने कपल्याची घटना ताजी असतानाच जालंदर मधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तपासणीसाठी कार रोखणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याला बोनेटवर टाकून गाडी पुढे ढकलण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब मधील जालंदर येथील एका चौकीवर पोलिसांनी गाडीतून जाणाऱ्या व्यक्तीची तपासणी करण्यासाठी गाडी थांबवण्यास सांगितले.
मात्र त्या व्यक्तीने पोलिसांच्या अंगावरच गाडी चाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो पोलीस गाडीच्या बोनेटवर पडला. यांनतर ही त्या माणसाने गाडीचा वेग कमी न करता गाडी तशीच पुढे नेली. त्यानंतर इतर पोलिसांनी व आजूबाजूच्या लोकांनी त्याला रोखले. व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.