दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक
बेळगाव ः कित्तूर चन्नम्मा ते आरटीओ रोडवरील न्यायालयाच्या संरक्षण भिंतीला लागूनच एक झाड सुकलेले आहे. ते झाड कधी पडेल, याची शाश्वती नाही. रहदारीच्या रस्त्यावरच हे झाड कोसळण्याची शक्मयता आहे. तेंव्हा हे झाड तातडीने हटवावे, अशी मागणी होत आहे. कित्तूर चन्नम्मा ते आरटीओ हा रस्ता सतत गजबजलेला असतो. या रस्त्यावरील फुटपाथवर हे झाड आहे. झाड कोसळल्यास मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. तेंव्हा महापालिका आणि वनविभागाने तातडीने हे झाड हटवावे, अशी मागणी होत आहे.