ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 64 हजार 553 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1007 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 24 लाख 61 हजार 191 वर पोहचली असून, मृतांची संख्या 48 हजार 040 एवढी आहे.

सध्या देशात 6 लाख 61 हजार 595 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 17 लाख 51 हजार 556 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तोंड बरे होण्याचे प्रमाण 71.16 टक्के इतके आहे.

आतापर्यंत देशात 2 कोटी 76 लाख 94 हजार 416 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 लाख 48 हजार 728 रुग्णांची तपासणी गुरुवारी एका दिवसात करण्यात आली.