नंदगड / वार्ताहर
नंदगड येथील रायापुरात असलेल्या क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या समाधीस्थळी प्रतिवर्षाप्रमाणे यावषी ही यात्रोउत्सव मोठय़ा उत्साहात झाला. यावषी समाधीच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला मेंढय़ांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत.
शनिवारी संगोळ्ळी रायाण्णा समाधीस्थळी कुरबर बांधवांच्यावतीने पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर समाधी स्थळावरील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला बसविण्यात येणाऱया मेंढय़ांच्या मूर्तीचे ट्रक्टरमधून नंदगड गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत आकर्षक ढोल वादन होते. यावेळी भंडारा उडवण्यात येत होता. मिरवणुकीत मोठय़ा संख्येने कुरबर बांधव सामील झाले होते.
रविवारी सकाळी होम व प्रवेशद्वारावरील मेंढय़ांच्या मूर्तीची प्रति÷ापना करण्यात आली. त्यानंतर शक्ती व युक्ती दर्शविणाऱया काही व्यक्तीनी प्रयोग सादर केले. त्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रमही झाले.