सावंतवाडी/ प्रतिनिधी-
सावंतवाडी पालिकेवर प्रशासक नियुक्त झाला तरी विकासाची कामे जलदगतीने होतील, असे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी स्पष्ट केलंय. माझ्या कारकिर्दीत नगराध्यक्ष म्हणून बबन साळगांवकर आणि संजू परब यांचे कामकाज पाहिले त्या दोघांचे काम चांगलेच होते असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले. सध्या नाट्यगृहाचे काम सुरू असून विद्युतकरणाचा त्यात समावेश नव्हता आता त्याचा समावेश करून टेंडर काढण्यात आले आहे. मे पर्यंत हे काम होईल असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
तसेच अग्निशमन इमारतीसाठी नियोजन काढून २ कोटी ७० लाख मंजूर झाले आहेत. तर पाणी पुरवठा विभागाची नियोजित नळपाणी योजना ही सुरू करण्यात संदर्भात पाऊले उचलण्यात येतील तसेच इंदिरा गांधी संकुलातील गाळे धारकाच्या प्रिमियर आणि भाडेवाढी संदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली होती त्यामुळे प्रिमियर आणि भाडेवाढीत सुधारणा होतील असे जावडेकर यावेळी म्हणाले.