बेळगाव : वडगाव येथील नरवीर स्पोर्ट्स आयोजित शॉर्ट पिच सिक्स फोर फुल ग्राऊंड क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फॉरेव्हर संघाने छत्रपती स्पोर्ट्स वडगाव संघाचा 8 गडय़ानी पराभव करून नरवीर चषक पटकाविला. वडगाव येथील स्मशान मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात छत्रपती स्पोर्ट्स वडगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकात 4 गडी बाद 23 धावा केल्या. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. फॉरेव्हर संघातर्फे निर्णायक षटकात आकाश छत्रेने 1 धावेत 2, दीपक जाधवने 7 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना फॉरेव्हर संघाने 2.5 षटकात 2 गडी बाद 24 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिकला. त्यात दत्तप्रसाद जांभवलेकरने 1 षटकार, 1 चौकारासह 13 तर समीर नाकाडीने 1 षटकारासह 11 धावा केल्या. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सचिन मदाळे, अभिषेक पाटील, शिवलिंग बेळगावकर व उदय होनगेकर यांच्या हस्ते विजेत्या फॉरेव्हर संघाला 15 हजार 1 रूपये रोख व चषक तर उपविजेत्या छत्रपती स्पोर्ट्स संघाला 9991 रूपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले.
Previous Articleझफरखान सरवरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Next Article सिद्धीविनायक स्पोर्ट्स संघाकडे शिवनेरी चषक
Related Posts
Add A Comment