नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महागाईला सामोरे जाणाऱया सर्वसामान्यांना मंगळवारी आणखी एक झटका बसला आह. रेल्वेने प्रवासभाडय़ात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वातानुकुलित तसेच जनरल शेणीचाही प्रवास महागला आहे. प्रति किलोमीटर 01 ते 04 पैशांपर्यंतची वृद्धी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना पूर्वीच्या तुलनेत अधिक रक्कम खर्च करावी लागणार आहे. तसेच या प्रवासभाडे वाढीचा सर्वाधिक प्रभाव दीर्घ अंतराच्या प्रवाशांवर पडणार आहे. नवे तिकीटदर 1 जानेवारी 2020 पासून लागू होणार आहेत.
साधारण रेल्वेंच्या विनावातानुकुलित शेणीच्या तिकिटामध्ये प्रति किलोमीटर 01 पैशांची वाढ करण्यात आली आहे. स्लीपर शेणीच्या प्रवासभाडय़ात 01 पैशांची वृद्धी करण्यात आली आहे. तर प्रथम शेणीच्या प्रवासभाडय़ात 1 पैशांची वाढ करण्यात आली आहे.
मेल एक्स्प्रेसच्या द्वितीय शेणीमधील प्रवाशांना प्रति किलोमीटर 2 पैसे अधिक खर्च करावे लागणार आहेत. स्लीपर शेणीच्या प्रवासभाडय़ात 2 पैसे तर प्रथम शेणीच्या प्रवासभाडय़ात प्रतिकिलोमीटर 2 पैशांची वृद्धी करण्यात आली आहे.
वातानुकुलित शेणीतील चेअर कारच्या तिकिटदरात प्रतिकिलोमीटर 04 पैसे तर एसी-3 टीयरसाठी 04 पैसे, एसी-2 टीयरच्या प्रवासभाडय़ात 04 पैसे आणि एसी-प्रथम शेणीच्या प्रवासभाडय़ात 04 पैसे प्रतिकिलोमीटरची भर पडली आहे.
प्रवासी आणि मालवाहतुकीच्या दरांमध्ये बदल करण्याच्या प्रक्रियेत रेल्वे असल्याची माहिती रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी गुरुवारीच दिली होती. कमी होत चाललेल्या उत्पन्नाला सामोरे जाण्यासाठी अनेक पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
रेल्वेने निश्चित कालावधीत प्रवासीभाडय़ाची समीक्षा करावी अशी शिफारस संसदेच्या समितीने मागील वर्षी केली होती. प्रवासभाडे व्यवहार्य करत रेल्वेचे उत्पन्न वाढविले जावे असेही समितीने म्हटले होते. प्रवासी सेवांमधून प्राप्त होणारे उत्पन्नात घट झाल्याने ही शिफारस करण्यात आली होती.
भारतीय रेल्वेचे उत्पन्न 10 वर्षांच्या नीचांकी स्तरावर पोहोचले आहे. रेल्वेचा ऑपरेटिंग रेशियो 2017-18 या आर्थिक वर्षात 98.44 टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजेच रेल्वेला 100 रुपयांच्या उत्पन्नासाठी 98.44 रुपये खर्च करावे लागत आहेत.