दक्षिण कोरियाने नववर्षानिमित्त कुठल्याही प्रकारचा सार्वजनिक सोहळा आयोजित करण्यास मज्जाव केला आहे. देशात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांतर्गत हे पाऊल उचण्यात आले आहे. दक्षिण कोरियाने कोरोनाच्या संसर्गावर बऱयाचअंशी नियंत्रण मिळविले असले तरीही अद्याप तेथे नवे रुग्ण आढळून येत आहेत. तेथे नववर्षानिमित्त बेल रायजिंग सोहळा आयोजित होतो. 67 वर्षांमध्ये पहिल्यांदाच हा सोहळा यंदा आयोजित होणार नाही. दक्षिण कोरियात प्रतिदिन सुमारे 500 नवे रुग्ण सापडत आहेत. केवळ सोल शहरातच 300 नवे रुग्ण सापडल्याने सरकार अधिक सतर्क झाले आहे. सोल शहरात आता रात्रसंचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Previous Articleरशिया : लसीकरण सुरू
Next Article महामारीमुळे 1 अब्ज लोक दारिद्रय़ाच्या वाटेवर
Related Posts
Add A Comment