ऍपलच्या इव्हेंटमध्ये विविध उपकरणांचे सादरीकरणः टीव्ही, आयपॅड सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील दिग्गज आयफोन निर्मिती करणारी कंपनी ऍपलने मंगळवारी रात्री उशिरा आपल्या पीक परफॉर्मेन्स इव्हेंटमध्ये स्वस्त आयफोन एसइ या मॉडेलचे सादरीकरण केले आहे. यामध्ये 5जी कनेक्टिव्हिटीची सोय उपलब्ध होणार आहे. सदरच्या फोनला ए 15 बायोनिक प्रोसेसरसोबत सादर केले आहे. यासोबतच आयफोन 13 आवृत्तीमध्येही उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले
आहे.
अमेरिकन बाजारात या मॉडेलची सुरुवातीची किमत ही 33000 रुपये आहे. तसेच भारतीय बाजारात याची किमत 43,900 रुपये राहणार असून हा दर अमेरिकेपेक्षा जवळपास 10,900 रुपयांनी स्वस्त राहणार आहे.
आयपॅड एअर लाँच
ऍपलने एम प्रोसेसर सोबत नवीन आयपॅड एअर सादर केले आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटीची सोय असण्यासोबत युएसबी-सी पोर्ट सपोर्ट आहे. यावेळी कंपनीने दावा केला आहे, की 10जीबीपीएसचे स्पीडसोबत डाटा ट्रान्स्फर करता येणार आहे.
आयफोन 13 आवृत्ती नव्या कलरमध्ये उपलब्ध
ऍपलने इव्हेंटमध्ये आयफोन 13 आवृत्तीला नवीन अल्पाइन ग्रीन कलरमध्ये सादर केले असून सोबत सिल्वर, गोल्ड, ग्रेफाइट आणि सिएरा ब्लू आदी कलरमध्ये हे मॉडेल उपलब्ध होणार
आहे.
ऍपल टीव्ही
ऍपल टीव्ही प्लस नवीन कंटेंट मिळणार असून ऍपल टीव्हीने सलगपणे नवीन आणि ओरिजनल कंटेंट वाढविला आहे. कंपनी ऍपल टीव्ही प्लसवर ऍपल ओरिजनल चित्रपटसोबत वेब सीरीज व गेमिंग सुरु करणार असल्याचे कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.