सांगली / प्रतिनिधी
मंगळवारी जिल्ह्यात नवीन 16 रुग्ण वाढले तर पंधरा जण कोरणा मुक्त झाले एकूण रुग्ण संख्या 384 वर पोचली आहे तर उपचारातील रुग्णसंख्या 131 आहे उपचारातील पाच रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
जत तालुक्यातील बिळूर येथे सलग दुसऱ्या दिवशी सहा रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे हे गाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. या गावात आत्तापर्यंत 18 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील त्या ज्येष्ठ राजकीय नेत्यांच्या कुटुंबालाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या घरातील 5 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तासगाव शहरात नवीन दोन रुग्ण वाढले, तर पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे दोन रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत, ही गोष्ट जिल्ह्याला दिलासा देणारी आहे.
Trending
- महिलांच्या छेडछाड प्रकरणी ‘झेपटो’च्या मॅनेजरसह 4 ते 5 डिलिव्हरी बॉयवर गुन्हा
- Kolhapur Breaking : कोल्हापूर जिल्हात दंगलीच्या पार्श्वभुमीवर 31 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद
- ‘कांदळवन व सागरी जैवविविधते’साठी 25 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
- वाघोली तलाठी कार्यालयातील मतदनीसांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
- कोल्हापुरातील दगडफेकीचा ग्रामीण भागात निषेध; गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाटा आणि सांगरूळात कडकडीत बंद
- ‘बिद्री’वर प्रशासक आणणार नसल्याची राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही
- जेजुरी देवस्थान विश्वस्तांच्या नेमणुका घटनेनुसार
- शहरातील परिस्थिती नियंत्रणात : शांतता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे