किमत 5 लाखावर, मिळणार अनेक सुविधा
नवी दिल्ली/ नवी दिल्ली
25 किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज देणारी मारुती सुझूकीची नवी वेगनार नुकतीच बाजारात दाखल झाली आहे. एका नव्या अवतारामध्ये सदरची गाडी दाखल झाली असून यातील एलएक्सआय वेरियंटची किंमत 5 लाख 39 हजार इतकी असणार आहे.
यामध्ये स्टार्टअप टेक्नॉलॉजीसह ऍडव्हान्स के सिरीज डय़ुअल जेट, डय़ुअल व्हीव्हीटी इंजिन असणार आहे. तसेच स्मार्टफोन नेव्हीगेशनसह सात इंचाची स्मार्ट प्ले स्टुडीओ इन्फोटेन्मेंट सिस्टीम चार स्पिकरसह यात असणार आहे. डय़ुअल एयर बॅग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, प्रंट सिट बेल्ट रिमाईंडर, हायस्पीड ऍलर्ट सिस्टीम तसेच रियर पार्किंग सेन्सर अशी अनेक सुरक्षित फिचर्स यात असतील.
25 किलोमीटरचे मायलेज
सदरची गाडी प्रतिलिटर 25 किलोमीटर इतके मायलेज देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या आधीच्या मॉडेलपेक्षा 16 टक्के ज्यादा मायलेज असेल.