ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
गेले काही दिवस भारतात कोरोनास्थिती काहीशी निव्वळीली आहे. अशी स्थिती आहे. मात्र जगातील काही देशांचा मागोवा घेतल्यास कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने काही देशात कोरोना विषाणूचा घातक ”ओमिक्रोन” व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झाल्याचं स्पष्ट झाले आहे. हा कोरोनाचा हा नवा विषाणू काही देशांमध्ये पसरला आहे. कोरोनावरील लस घेतलेल्यांमध्ये तयार झालेल्या प्रतिकारशक्तीवर सुद्धा हा ओमिक्रोन व्हेरिएंट मात करत असल्याचं समोर आल्यानं जगभरात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभुमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बैठक घेत देशातील कोरोना विषयक उपाययोजनांचा आढावा घेतला.|
ही बैठक तब्बल दोन तास चालली. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशात कोरोना विषयक उपाययोजना करणाऱ्या संबंधित यंत्रणांनी आणखी सक्रिय रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. करोनाच्या व्हेरिएंटबाबतची सद्य स्थिती पंतप्रधानांनी माहिती करुन घेतली. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. तेंव्हा सध्या तरी अशी कोणतीही बंदी घातली गेली नसल्याचे बैठकीनंतर स्पष्ट झालं.
तरी ही सध्याची कोरोनाची बदलती स्थिती लक्षात घेता आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत असलेल्या निर्बंधांचा आढावा घेण्याचे निर्देश पंतप्रधान यांनी यावेळी दिले. दरम्यान या बैठकीत केंद्रीय अधिकाऱ्यांना राज्यांच्या प्रशासनाशी सतत संपर्कात रहाण्याच्या सुचना पंतप्रधानांनी यावेळी केल्या आहेत.