ऑनलाईन टीम/तरुण भारत
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांची केंद्र सरकारवरील टीका सुरुच ठेवली आहे. त्यांनी यापूर्वी अनेक मुद्द्यांवर केंद्रावर निशाणा साधला आहे. आता परत एकदा त्यांनी बीएसएफच्या अधिकारक्षेत्रावरुन केंद्रावर टीका केली आहे. ‘त्यांना वाटते की, बहुमत असल्यामुळे ते काहीही करू शकतात. पंजाबमध्ये त्यांनी 50 किमीचा परिसर बीएसएफला का दिला? पोलिसांच्या कार्यक्षमतेवर त्यांना विश्वास नाही का? नागालँडप्रमाणे पंबाजमध्येही हत्या होणार’, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे. ते शेर-ए-काश्मीर भवन येथे आयोजित एक दिवसीय परिषदेत फारुख अब्दुल्ला बोलत होते
दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांनी, ‘आम्हाला पाकिस्तानी म्हटले जायचे, मला खलिस्तानीही म्हटले जायचे. पण आम्ही कधीही भारताविरोधात घोषणाबाजी किंवा कट कारस्थान केले नाही. आम्ही महात्मा गांधींच्या मार्गावर चालत आहे आणि गांधींचा भारत परत आणू इच्छितो. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यापासून राज्यात अडचणी वाढल्या आहेत’, असंही ते म्हणाले.