एमसीसी आयोजित अल्फा चषक 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
एमसीसीसी आयोजित अल्फा चषक 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी निना स्पोर्ट्स संघाने एनसीसीसी संघाचा 30 धावांनी तर रॉजर्स अकादमीने एमसीसीचा 4 गड्यांनी पराभव करुन विजयी सलामी दिली. मदन चाडीचल व अभिषेक परमार यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून काकती ग्रा. पं. सदस्य सुशांत परमोजी, संजय सोमाई, शिवलाल कलाल, शिवप्पा दमनगी, अरुण कांबळे, माजीद मकानदार, प्रकाश पावले, महातेश गवी, सुनील देसाई, गौस हाजी, नियाज इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन व श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. निना स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 22 षटकात 9 गडी बाद 166 धावा केल्या. त्यात मदन चाडीचलने 1 षटकार व 8 चौकारांसह 46, ओमकार तेलवेने 5 चौकारांसह 31, आकाश मरबादने 5 चौकारांसह 26 तर बिलाल मन्नुरवालेने 21 तर नियाज पिरजादेने 20 धावा केल्या. एमसीसीसीतर्फे हर्ष कित्तुरने 29 धावात 3, कृष्णा मेणसेने 30 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसीसी संघाचा डाव 21 षटकात 136 डावात आटोपला. त्यात मुवाज मुल्लाने 6 चौकारांसह 30, हर्षलाल मजादारने 3 चौकारांसह 21 धावा केल्या. निनातर्फे मदन चाडीचलने 19 धावात 3, जीएनपी, ओवेझ निंबुवले यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात एमसीसीसी संघाने प्रथम फलंदाजी करताना 22 षटकात सर्व गडी बाद 142 धावा केल्या. त्यात परवेज मोरबने 1 षटकार 4 चौकारांसह 33, मलिकने 27 धावा केल्या.
रॉजर्सतर्फे अभिषेक पम्मारने 6 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉजर्स संघाने 19.3 षटकात 6 गडी बाद 144 धावा करुन सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात शिवकुमार बी. ने 6 चौकारांसह 35, अभिषेक पम्मारने 1 षटकार 3 चौकारांसह 35 तर पृथ्वी पावशेने 2 षटकार 3 चौकारांसह 24 धावा केल्या.
मंगळवारचे सामने : युनियन जिमखाना वि. निना स्पोर्ट्स अकादमी स. 8 वा. दुसरा सामना युनियन जिमखाना वि. रॉजर्स क्रिकेट अकादमी दु. 12.30 वा.