प्रतिनिधी/ निपाणी
निपाणीत शुक्रवारी गीत जयंतीचे औचित्य साधून ऍड. राम चव्हाण लिखीत सुलभ भगवत गीताचे प्रकाशन प्राणलिंग स्वामीजी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सुलभ भगवत गीतेचे कन्नड भाषेत रुपांतर करून कन्नड भाषिकांनाही याचा लाभ मिळवून द्यावा, असे मत प्राणलिंग स्वामीजी यांनी व्यक्त केले. डॉ. श्रीकृष्ण देशमुख म्हणाले, भगवत गीतामध्ये जीवनाचे सार आहे. याचे वाचन केल्यास जीवन आनंददायी होईल, असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब महाराज म्हणाले, ऍड. राम चव्हाण यांनी, संस्कृतमधील भाषेचे मराठीमध्ये अनुवाद केल्याने सर्वसामान्यांना भगवत गीता समजणे सोपे ठरणार आहे. यावेळी सुभाष मेहता, ऍड. बी. ए. बन्ने, डॉ. सी. बी. कुरबेट्टी, अरविंद सोलापूरकर, राजू बोळके आदी उपस्थित होते.