मधुसुदन शर्मा यांचे प्रतिपादन : रस्ते अपघातांसंदर्भात एक दिवसीय कार्यशाळा

प्रतिनिधी /बेळगाव
राज्यात दरवषी रस्ते अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी नियम पाळल्यास हे अपघात टाळता येतात. त्यामुळे नियमांचे पालन करा आणि जीव वाचवा, असे प्रतिपादन कट्स इंटरनॅशनल संस्थेचे ज्ये÷ कार्यक्रम अधिकारी मधुसूदन शर्मा यांनी केले.
शहरातील ईफा हॉटेलमध्ये आज शुक्रवारी पब्लिक अफेअर्स फाऊंडेशन आणि कट्स इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते अपघातासंदर्भात एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत शर्मा बोलत होते. एकटय़ा कर्नाटकात रस्ते अपघातामुळे दरवषी 11 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. त्याचप्रमाणे 50 हजार व्यक्तींवर कायमचे अपंगत्व पत्करून परावलंबी होण्याची पाळी येते, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन नियम पाळावेत, असे ते म्हणाले.
अपघाताच्या घटनांमुळे मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांनाही अनेक त्रास आणि मनःस्तापाला सामोरे जावे लागते. त्यामुळे वाहन चालवताना सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळून काळजी घेणे गरजेचे आहे. वैज्ञानिक पद्धतीने बनवलेले रस्ते हे देखील अपघाताचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे अपघातप्रवण क्षेत्रात अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, असे मधुसुदन शर्मा म्हणाले.
मान्यवरांकडून मार्गदर्शन
उपस्थित मान्यवरांपैकी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. वाहन चालविताना घेण्याची काळजी व सावधगिरी बाळगल्यास अशा घटनांना आळा घालता येतो. परिणामी याकडे वाहनचालकांनी लक्ष देण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली.
कार्यशाळेस प्रादेशिक आयुक्त आदित्य अम्लान बिस्वास, पब्लिक अफेअर्स फाऊंडेशनच्या अन्नपूर्णा रविचंद्र, परिवहन खात्याचे मुख्य राजेंद्र कटारिया, प्रादेशिक परिवहन अधिकारी एम. शोभा, आरटीओ शिवानंद मगदूम, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, आरटीओ फेडरेशनचे अध्यक्ष अन्सार अहमद आदी उपस्थित होते.