ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी विनय कुमार आणि मुकेश याने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर 14 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्यात येणार आहे. न्यायमूर्ती एन वी रमणा, न्यायमुर्ती अरूण मिश्रा, न्यायमुर्ती आर. एफ नरीमन, न्यायमुर्ती आर भानूमती, न्यायमुर्ती अशोक भूषण यांच्या न्यायपीठात ही सुनावणी होणार आहे.
दरम्यान, दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणातील चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. या चार दोषींना 22 जानेवारी या दिवशी सकाळी 7 वाजता फाशी देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
निर्भयाच्या दोषींना 22 जानेवारीला फाशी देण्यात येईल, की त्यांना काही दिवस दिलासा मिळेल, हे 14 जानेवारी समजणार आहे.