प्रतिनिधी / बेळगाव :
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या नाशिक विभागाच्या महिला शाखेने आयोजित केलेल्या कोरोना संबंधी निबंध स्पर्धेत बेळगावच्या निर्मला कळ्ळीमनी यांनी व्दितीय क्रमांक मिळविला आहे.
लॉकडाऊन काळात महिलांनी अनेक विविध उपक्रम राबविले. जितोच्या नाशिक येथील महिला विभागाने निबंध स्पर्धा आयोजित केली. विश्वामध्ये कोरोना आणि माझा भारत, लॉकडाऊनचा काळ आणि माझा परिवार तसेच कोरोनाबद्दल प्रत्येक समाजाची दृष्टि असे तीन विषय निबंध स्पर्धेसाठी देण्यात आले होते.
एकूण 115 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये निर्मला कळ्ळीमनी यांनी व्दितीय क्रमांक मिळविला. निर्मला मंथन संस्थेच्या माजी अध्यक्षा असून सध्या जितोच्या बेळगाव कार्यकारीणीच्या सदस्या आहेत.