वार्ताहर/ लोणंद
लोणंद नगर पंचायातची पंचवार्षिक निवडणुक ही 18 जानेवारी रोजी होत असून लोणंदचे बहुतांश सर्व ढाबे तळीराम व जेवणासाठी फुल झाल्याचे चित्र सध्या दिसत आहेत
सध्या लोणंद शहरात असणाया भरपुर ढाब्यांवर तळीरामांनी जेवणाचा अड्डा केला असून संबंधित विभाग याकडे का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न उपलब्ध होत आहे ? अनेक सजग नागरिकांकडून ढाबा मालकांना विचारले दारु पिऊन द्यायला परमीशन आहे का तर तुम्ही बाहेरून दारु घेऊन आला तर ढाब्यावर दारु प्यायला परमिशन आहे असे सांगण्यात येत आहे अनेक ढाबे वाल्यांनी शासनाचे नियम धाब्यांवर ठेवत आपली मनमानी लावली आहे अनेक ढाब्यांवर दारुंच्या बाटल्यांचे खच च्या खच सापडत आहेत .आचार संहितेमुळे ढाब्यांना वेळेचे बंधन असताना देखील अनेक ढाबे 1 वाजे पर्यंत उघडे असल्याचे दिसत आहे संबंधित विभागाने याकडे लक्ष देत त्वरीत कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्यातुन होत आहे.