बुद्धांच्या केसांवर टिकलाय सोन्याचा रहस्यमय दगड
म्यानमारच्या माने राज्यात असलेले प्रसिद्ध बौद्ध तीर्थस्थळ क्याइत्कियो पर्वतांवर स्थित आहे. ढगांनी वेढलेल्या या स्थळाच्या उत्पत्तीचे रहस्य आणि पौराणिक कथा भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतात. सुमारे 25 फूट उंच हा खडक एकप्रकारे आश्चर्य आहे. एका दरीच्या काठावर संतुलनाच्या आधारावर हा खडक टिकलेला आहे.
कुठल्याही सर्वसामान्य माणसासाठी हे आश्चर्यकारक आणि जवळपास अशक्य वाटणारे दृश्य असू शकते. परंतु भाविकांसाठी हा देवाच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. बुद्धांच्या चमत्कारी शक्तींमुळे हा दगड संतुलनात राहत असल्याचे भाविकांचे मानणे आहे. दगड आणि पर्वतादरम्यान बुद्धांच्या केसाचे एक टोक ठेवण्यात आल्याने हे अद्भूत संतुलन साधले गेल्याचे मानले जाते.
स्मिथसोनियन चॅनेलची डॉक्यूमेंट्री ‘वंडर्स ऑफ बर्मा ः श्राइन्स ऑफ गोल्ड’दरम्यान याची कहाणी आणि इतिहासाचा शोध घेण्यात आला. यात या स्थळाच्या अद्भूत ‘शक्ती’चा उल्लेख करण्यात आला असून जी गुरुत्वाकर्षणाला चकवा देते. संशोधकांनुसार हे एक नैसर्गिक आश्चर्य असून ज्याला कहाण्यांनी एक पवित्र स्थळाचे स्वरुप दिले आहे.

अनेक कहाण्या प्रचलित
स्थानिक स्तरावर अनेक कहाण्या या ठिकाणावरून प्रचलित आहेत. एका कहाणीनुसार दगड केसावर ठेवण्यात आला आहे. हा केस दगडाला पर्वतावरून खाली जाण्यापासून रोखण्यास मदत करत असल्याची मान्यता आहे. येथे उभारण्यात आलेले मंदिर आणि याच्या मागील कहाण्यांनी माउंट क्याइत्कियो आणि गोल्डन रॉकला पूर्ण देशात सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्थळांपैकी एक ठरविले आहे.
म्यानमारमधील भक्ती केंद्र
गोल्डन रॉक वर्षभरासाठी जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असते. तर नोव्हेंबर आणि मार्चदरम्यान येथे भक्तिमय वातावरण दिसून येते. पूर्ण म्यानमारमधून लोक येथे येता आणि मंत्रोच्चार करतात, मेणबत्त्या पेटवून ध्यान करतात.