नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नीट पदव्युत्तर पदवीसाठीची (नीट-पीजी) परीक्षा लांबणीवर टाकली आहे. यापूर्वीच्या नियोजनानुसार ही परीक्षा 12 मार्च रोजी होणार होती. मात्र, त्यात बदल करून सहा ते आठ आठवडय़ांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा मे-जून महिन्यात होण्याची शक्मयता आहे. कोरोना काळातील निर्बंधांमुळे अनेक विद्यार्थ्यांना इंटर्नशिप पूर्ण करता आली नाही. साहजिकच इंटर्नशिप पूर्ण न केलेले विद्यार्थी ‘नीट-पीजी’ परीक्षेला मुकले असते. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती.