प्रतिनिधी / मडगाव
नुवे येथील माय दोस पोब्रोस विद्यालयात 45 आणि त्याहून अधिक वर्षांच्या लोकांचे लसीकरण करण्यासाठी बुधवारी केंद्र उभारण्यात आले आहे. नुवेचे आमदार विल्प्रेड डिसा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सदर लसीकरण केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार सदर केंद्र मिळाल्याने आमदार डिसा यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्य खात्याचे आभार मानले आहेत.
नुवे मतदारसंघात सहा पंचायत क्षेत्रे असून लोटली येथे आरोग्य केंद्र असल्याने तेथे लसीकरण होत होते. मात्र उर्वरित पाच पंचायत क्षेत्रांतील लोकांना या केंद्रावर जाऊन लसीकरण करून घेणे अडचणीचे ठरत होते. त्यासाठी नुवे येथील विद्यालयात लसीकरण केंद्राची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले गेले. आपण सर्व पंचायत क्षेत्रांत आधी लसीकरण मोहिमा आयोजित केल्या होत्या. मात्र यातून जास्त करून 45 वर्षांवरील लोकांचे लसीकरण होऊ शकले नाही. त्यांना आता या पेंद्रावर येऊन लसीकरण करणे शक्मय होईल. तसेच 18 वर्षांवरील वयोगटातील नुवेत लवकरच लसीकरण सुरू होणार असल्याचे आमदार डिसा यांनी नजरेस आणून दिले.