पाण्याच्या प्रभावाहातही राहणार सुरक्षित
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
नॉइजने अखेर आपल्या नवीन स्मार्टवॉच नॉइज कलरफिट अल्ट्रा 2 चे सादरीकरण केले आहे. नॉइज कलरफिट अल्ट्रा 2 चे सुरुवातीची खास किमत ही 5,000 रुपयापेक्षा कमी राहणार आहे. ऍमेझॉन आणि कार्यालयीन साइटवर दोन्ही ठिकाणी सदरच्या घडय़ाळावर 50 टक्के सवलत मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सदरच्या वॉचमध्ये 60पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड, सात दिवसांमध्ये बॅटरीची क्षमता प्राप्त होणार असल्याचेही सांगितले आहे.
नॉइज कलरफिट अल्ट्रा 2 ची भारतामधील किमत
भारतामध्ये नॉइज कलरफिट अल्ट्रा 2 ची किमत 4,499 रुपये आहे. स्मार्टवॉच नेव्ही ब्लू, व्हाइड आणि ऑलिव ग्रीन कलरचा पर्याय खरेदीसाठी प्राप्त होणार आहे.
विविध फिचर्सची सुविधा
- नॉइज कलरफिट अल्ट्रा 2 मध्ये 1.78 इंच अमोलेड डिस्प्ले, रिझोल्यूशन 368 ते 448 पिक्सल
- स्मार्टवॉच प्रीमियम स्टेनलेस स्टील बॉडीसह येणार, सोशल मीडिया नोटिफिकेशनसह इनकमिंग कॉलसह मॅसेज डिस्प्ले होणार
- स्मार्टवॉच रिमाइंडर, स्टॉक अलर्ट, हवामान, टॉर्च, कॅलक्यूलेटरसह अन्य फिचर मिळणार