ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय नौदलाचे मिग-29 के हे प्रशिक्षणार्थी विमान अरबी समुद्रावरून उड्डाण करताना दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत एक पायलट बचावला असून, दुसऱ्या पायलटचा शोध सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
वृत्तसंस्थेनेच्या ट्विटनुसार, गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भारतीय नौदलाचे मिग-29 के हे प्रशिक्षणार्थी विमान अरबी समुद्रावरून उड्डाण करत असताना दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानात दोन पायलट होते. दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या एका पायलटला वाचवण्यात यश आले असून, दुसऱ्या पायलटचा शोध सुरू आहे.
बेपत्ता पायलटचा शोध घेण्यासाठी नौदलाने विमाने आणि बोटी तैनात केली आहेत. तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.