ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
न्यायमूर्ती एन व्ही रामन्ना हे देशाचे नवे मुख्य न्यायाधीश असतील. विद्यमान मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रामन्ना यांच्या नावाची शिफारस केली होती. त्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे.
सीजेआय एस.ए बोबडे 23 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत आणि न्यायमूर्ती एनव्ही रमन्ना 24 एप्रिल रोजी पुढील सीजेआय म्हणून शपथ घेतील. न्यायमूर्ती नथुलापती वेंकट रमन्ना यांची 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, न्यायमूर्ती रमन्ना 26 ऑगस्ट 2022 रोजी निवृत्त होणार असल्याने त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांहून कमी असणार आहे.