डॉक्टर झालेल्या एका महिलेचे लग्न ठरले. लग्न समारंभासाठी दिनांक ठरला. तथापि मुहूर्ताची वेळ टळून गेली तरी होणारा पती आलाच नाही. त्यामुळे संतापलेल्या वधूने लग्नासाठी आलेल्या आपल्या सर्व हितचिंतकांना आणि कुटुंबीयांना घेऊन शंखनाद करत वराचे घर गाठले. आणि वराच्या घरातील पडवीवर या साऱयांनी धरणे धरले. ही घटना भुवनेश्वर येथील आहे. वधूचे नाव डिंपल दास असे असून होमिओपॅथिक डॉक्टर आहे. तिचा परिचय ऍलोपॅथिक डॉ. सुमीत साहू याच्याबरोबर झाला आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी सात महिने दोघेही लिव्ह इन रिलेशीपमध्ये राहिले. या विवाहाला दोन्ही परिवाराची संमती असल्याने मुहूर्त ठरविण्यात आला. तथापि ऐनवेळी वराचे मन फिरले आणि त्याची वरात लग्नस्थळी आलीच नाही. वधू लग्नासाठी हट्ट धरून बसली होती तर वराकडच्या मंडळींनी घटस्फोटासाठी अर्ज सादर केला आहे असे सांगण्यास सुरुवात केली होती. अखेरीस हे प्रकरण पोलीस स्थानकात पोहोचले. पोलिसांनी मध्यस्थी करून शांत केले.
Previous Articleदहशतीची सावली…
Next Article ज्याच्यात सत्य नाही तो धर्मच नव्हे
Related Posts
Add A Comment