वार्ताहर / कसबा बावडा
पचगंगा नदीत पाण्याच्या प्रवाहात बुडुन बेपत्ता. संस्कार राहुल कुरणेचा मृतदेह आज शिये फुलाजवळ मिळाला दोन दिवसांपुर्वी सकाळी घरात फिरायला जातो म्हणून कदमवाडीहुन कसबा बावडा पंचगंगा नदीवर आंघोळीसाठी आली होती. आंघोळीसाठी पाण्यात उतरले पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे जण पाण्याच्या प्रवाहातून वाहुन गेली होती. त्या पैकी एकास वाचवण्यास आले. पण संस्कार हातातून सुटला तो पाण्याच्या प्रवाहातून वाहत गेल्याने बेपता झाला होता. दोन दिवस त्या साठी शोधमोहीम सुरु होती आज त्याला यश आले. आणि आज सकाळी नऊच्या दरम्यान संस्कारचा मृतदेह शिये फुलाजवळ जॅकवेल शेजारी पाण्यावर तरंगताना दिसला.
आग्नीशामक जवान बोटीच्या सहाय्याने मृतदेह पाण्याबाहेर काढला या महिमेत स्टेशन ऑफीसर मनिश रणभिसे नेतृवाखाली, सुनिल वाईगडे, मधुकर जाधव, प्रमोद मोळे, अभय कोळी, सुनिल यादव हे अग्नीशामक जवान परिश्रम घेतले संस्कार चा मृतदेह शिरोली पोलीस स्टेन्शनच्या ताब्यात देवून शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आला आहे.
Related Posts
Add A Comment