ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोना बाधितांनी 2.15 लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यातच आज दिवसभरात 2,319 नव्या रुग्णांची नोंद झाली. 58 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 15 हजार 409 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवसात 1,870 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2,15,409 रुग्णांपैकी 1 लाख 90 हजार 399 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 382 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 18,628 ॲक्टिव्ह रुग्ण
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आज दिवसभरात 23,172 जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले. तर आतापर्यंत जवळपास 56 लाख 26 हजार 458 जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. सद्य स्थितीत 18 हजार 628 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 270 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 23 जण व्हेंटिलेटरवर आहेत.